नाशिक : सिडको – इंद्रनगरी परिसरातील रस्त्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे : बडगुजर | पुढारी

नाशिक : सिडको - इंद्रनगरी परिसरातील रस्त्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे : बडगुजर

सिडको : पुढारी वृत्तसेवा – राज्यशासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र रस्ते विकसित करण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख व प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

महानगरपालिके तर्फे सिडको भागात रस्ते विकसित केले जाते. परंतु प्रभाग क्रमांक क्रमांक २५ मधील इंद्रनगरी परिसरात शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या निधीमधून  रस्ते विकसित करण्याचे काम सुरु आहे. परंतु सदर रस्ते विकसित व्यवस्थित केले जात नाही तसेच नियमा प्रमाणे रस्ते तयार केले जात नाही व रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केली या नंतर बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्ते विकसित करणारे कामाची पाहणी केली तर  रस्ते विकसित करण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तर रस्ता दर्जेदार बनविला नाही तर बांधकाम विभागाकडे तक्रार करून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .

सिडको प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी परिसरात सुरु असलेले रस्ते विकसित करण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे तसेच रस्ते बनवताना सर्व नियमांची पायमल्ली करून रस्ते बनवताना आढळून आले आहे. – सुधाकर बडगुजर, ठाकरे गटशिवसेना जिल्हाप्रमुख.

हेही वाचा:

Back to top button