बीड: गेवराईमध्ये एटीएम मशीनची तोडफोड | पुढारी

बीड: गेवराईमध्ये एटीएम मशीनची तोडफोड

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कोल्हेर रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये तोडफोड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून  समोर आला आहे. या प्रकरणी एका जणाविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई शहरातील कोल्हेर रोडवर एसबीआय बँकेचे एटीएम आहे. आज सकाळी सदरील एटीएममध्ये तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती कळताच बँकेच्या अधिकाऱ्यांसह एटीएम मेन्टेन्सचे काम पाहणारे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एटीएमची पाहणी केली असता काचाच्या दरवाजा दगड, विटा मारून मशीन फोडलेले आढळून आले. त्याचबरोबर एटीएमचे मॉनिटर, एटीएममधील एसीचीही मोडतोड करून जवळपास १ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले.

यावेळी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३.४५ वाजता एक जण दगड व विटा मारून एटीएमची मोडतोड करत असल्याचे दिसून आले.  चौकशी केली असता तोडफोड  करण्याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी एटीएम मेन्टेन्सचे काम पाहणारे दत्तात्रय वेदपाठक यांच्या फिर्यादीवरून एका विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा  

Back to top button