

धारूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धारूर तालुक्यातील आवरगाव येथे आज शुक्रवारी (दि.२७) सकाळी ९ वाजता साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली. या उपोषणास सकल मराठा बांधवांसह जेष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत.
अंतरवली सराठी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धारूर तालुक्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण व पुढाऱ्यांना गाव बंदी आंदोलन सुरू केले जात आहे. आवरगाव येथे आज (दि.२७) सकाळी ९ वाजता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणाला पहिल्या दिवशी जेष्ठ नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. यामध्ये विष्णु (आप्पा) पंढरीनाथ नखाते (वय ८०), बन्सी (बप्पा) योगिराज जगताप (वय ६८) हे जेष्ठ नागरिक २४ तास उपोषणस्थळी बसून राहिले. यापुढेही गावातील ज्येष्ठ नागरिक सुरू असलेल्या उपोषणामध्ये सहभाग घेणार असल्याचे सरपंच अमोल जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा :