Railway News: एलटीटी- नांदेड दरम्यान १६ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन | पुढारी

Railway News: एलटीटी- नांदेड दरम्यान १६ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: दसरा – दिवाळीनिमित्त नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते नांदेड दरम्यान १६ फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला तरी या गाड्यांचे तिकिट दर स्पेशल गाड्यांप्रमाणे आकारण्यात येणार आहे. (Railway News)

०७४२७ एलटीटी – नांदेड स्पेशल ट्रेन २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी दुपारी ४.४० वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता नांदेडला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ०७४२६ ट्रेन २३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान नांदेडहून दर सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा. एलटीटीला पोहोचणार आहे. या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा स्थानकात थांबा दिला आहे. (Railway News)

२०७४२९ एलटीटी-नांदेड़ ट्रेन २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी दुपारी ४.५५ वा. सुटून नांदेडला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. पोहोचेल. परतीकरिता ०७४२८ ट्रेन २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी रात्री ९.१५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी १ वा. एलटीटीला पोहोचेल. या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा स्थानकात थांबा दिला आहे. प्रवासी या स्पेशल गाड्यांचे आरक्षण २२ ऑक्टोबरपासून करु शकतात. (Railway News)

Back to top button