हिंगोली: मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी; चिखली ग्रा.पं.मध्ये ठराव | पुढारी

हिंगोली: मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी; चिखली ग्रा.पं.मध्ये ठराव

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मौजे चिखली (ता.कळमनुरी, जि. हिंगोली) येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतीमध्ये आज (दि.९) ठराव करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच चंद्रकला सूर्यवंशी, उपसरपंच योगिता चव्हाण, ग्रामसेवक बकरे एस. ए, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी व पुढील सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. चिखली येथील ग्रामस्थांनी हा ठराव घेतल्याचे समजतात परिसरामध्ये चिखली सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button