हिंगोली – भर पावसात मराठा बांधवांनी रोखला वाशिम ते हिंगोली महामार्ग | पुढारी

हिंगोली - भर पावसात मराठा बांधवांनी रोखला वाशिम ते हिंगोली महामार्ग

हिंगोली – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास महामागर् रोखण्यात आला. वाशिम ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील माळहिवरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा दिल्या. जवळपास एक तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ माळहिवरा, जोडतळा, खंडाळा यासह इतर गावातील सकल मराठा समाजातील युवक एकत्र आले. माळहिवरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एक तास दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भर पावसात युवकांनी महामार्ग रोखून धरला. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तासभरानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button