बीड -मराठा आरक्षण मुद्द्यावरून गेवराईत उद्या बंद | पुढारी

बीड -मराठा आरक्षण मुद्द्यावरून गेवराईत उद्या बंद

गेवराई (बीड) – पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रकरणी शहरातील बेदरे लॉन्समध्ये मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत अंदोलन समाज बांधव करणारच, असा एकमुखी निर्णय गेवराई येथील मराठा समाज बांधवांनी घेतला आहे.

राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून या अंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले. मनोज जरांगे पाटील हा तरुण मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन करत असून आता तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी गेवराईत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यात यावे, यासाठी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या दि.१ सप्टेंबर शुक्रवार रोजी गेवराई शहर बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी बांधवानी या बंदला सहकार्य करावे, असे देखील अवाहन करण्यात आले. कसलेही तीव्र पडसाद न उमटता हा बंद शांततेत पार पाडावा, असे दाखल अवाहन मराठा समाज बांधवांनी केली आहे. या बैठकीस गेवराई तालुक्यातील तरुण बांधव उपस्थित होते.

Back to top button