जालना : मत्स्योदरी देवी मंदिराची दानपेटी फोडून ५ लाखांची रक्कम लंपास | पुढारी

जालना : मत्स्योदरी देवी मंदिराची दानपेटी फोडून ५ लाखांची रक्कम लंपास

वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा : अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात चोरी दानपेटी फोडून अंदाजे ५ लाख रक्कम चोरी झाली. अशी माहिती मत्स्योदरी देवी मंदिर संस्थान अध्यक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली. दानपेटी चोरी गेल्याचा प्रकार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी मत्स्योदरी देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, पोलिस, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञ दाल झाले असून पाहणी करत आहे. या चोरीच्या घटनेमुळे मत्स्योदरी देवींच्या भाविक भक्तात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

मत्स्योदरी देवी मंदिराच्या दानपेटीतून रोख रक्कम चोरी प्रकरण तपास सुरु असून अंबड पोलिस ठाण्याचे दोन पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक असे पाच पथक चोरीच्या घटनेचा तपास करत आहे. – मुकुंद आघा, पोलिस उपविभाग अधिकारी अंबड

Back to top button