लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्ये भाजपला पोषक वातावरण : भूपेंद्र यादव | पुढारी

लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्ये भाजपला पोषक वातावरण : भूपेंद्र यादव

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसारखी स्थिती लोकसभा निवडणुकीत होणार नाही. उलट देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता यावी, यासाठी मतदारच अग्रही आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात हेच चित्र दिसले. या लोकसभा मतदार संघात भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचा विश्वास भाजपचे नेते तथा केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी आज (दि.११) व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, उत्तराखंडच्या खासदार कल्पना सैनी, आमदार प्रशांत बंब, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, समीर राजूकरकर यांची उपस्थिती होती.

मंत्री यादव म्हणाले की, भाजपने देशात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी पक्षाला चांगले वातावरण दिसत आहे. पहिल्यापेक्षा अधिक बहुमताने मोदी सरकार सत्तेत येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामे सुरू असल्याने चांगले चित्र असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा मित्र पक्ष असेल, अशी चर्चा आहे. यावर यादव यांनी स्मित हास्य करत, ते तर आम्हाला पराभूत करण्यास निघाले आहेत, असे म्हणत अधिक बोलणे टाळले. तसेच खासदार संजय राऊत यांनी महिनाभरात सरकार कोसळले, असा दावा केला आहे, यावर यादव म्हणले. राऊत हे भविष्यवक्ता आहेत. परंतु, त्यांचे हे भविष्य चूकीचे ठरेल. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार जनतेच्या विकासाची कामे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button