नांदेड: पाकिस्तानातील देशविरोधी व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंध; नरसीतील तरुणाला अटक

नांदेड: पाकिस्तानातील देशविरोधी व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंध; नरसीतील तरुणाला अटक
Published on
Updated on

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानात असलेल्या एका व्हॉट्सअँप ग्रुपवरील चॅटिंग प्रकरणी सुरत येथे गुन्हा दाखल झाला आहे. यात नरसीतील २ तरुणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरत पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले आहे. यामुळे नरसी नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे. Nanded News

नेमका प्रकार काय ?

  • 'जैश बावा राजपूत' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानातील आहे.
  • या  व्हॉट्सअॅप ग्रुपवर देशविरोधी चॅटिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • या प्रकरणी गुजरातमधील सुरत येथे गुन्हा दाखल झाला आहे.
  • नरसी (ता. नायगाव) येथील शेख शकील सत्तार याचा सहभाग आढळून आला.
  • सुरत गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नरसीतील तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पाकिस्तानातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर देशविरोधी चॅटिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुजरातमधील सुरत येथे गुन्हा दाखल झाला आहे. यात नरसी येथील दोन तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. सुरत गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१२) सकाळी त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी एका तरुणाला नोटीस देवून सोडून दिले आहे. तर एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Nanded News

'जैश बावा राजपूत' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानातील आहे.

'जैश बावा राजपूत' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानातील आहे. हा ग्रुप वकास व सरफराज चालवत होते. त्यांनी सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे हिंदु‌त्ववादी नेते राजासिंग, वृत वाहिनीचे संपादक सुरेश आणि नूपुर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हिंदू‌विरुद्ध भडकाविण्याचे प्रकार केले आहेत. तसेच परदेशातून शस्त्रे आयात करण्याचे चॅटिंग सापडले आहे.

Nanded News : नरसी (ता. नायगाव) येथील शेख शकील सत्तार याचा सहभाग आढळला

या गंभीर गुन्ह्याचा सुरत गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केल्यानंतर आरोपी व व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमधील तपासणी केली. यामध्ये नरसी (ता. नायगाव) येथील शेख शकील सत्तार याचा सहभाग आढळून आला. त्यामुळे सुरत गुन्हे शाखेचे पथकाने रविवारी कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळत नरसी शहर गाठले.

यावेळी त्यांच्यासोबत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे काही कर्मचारी उपस्थित होते. शेख शकील शेख सत्तार (वय १८) यास नरसी चौकीत बोलावण्यात आले. त्याचबरोबर त्याचा अन्य एका मित्रालाही हजर करण्यात आले. याप्रकरणी सुरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघांची चौकशी केली. यावेळी शेख शकीलच्या मित्राला नोटीस देवून सोडण्यात आले. तर पुढील चौकशीसाठी शेख शकील शेख सत्तार यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली.

Nanded News : शेख शकील हा बीएसस्सीचे शिक्षण घेत आहे.

शेख शकील हा बीएसस्सीचे शिक्षण घेत असून तो नरसी येथे मजीद जवळ असलेल्या घरात राहतो. तो कुणाच्याही जास्त संपर्कात नव्हता. त्याचे वडील शेती करतात. त्याचे आजोबावर गंभीर गुन्हा दाखल होता, अशी माहिती मिळाली आहे.

हे प्रकरण गंभीर असल्याने गुन्ह्याचा प्रकार पाहता गुप्तचर विभागाने कमालीची गुप्तता पाळत कार्यवाही केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शंकर नगर रामतीर्थ ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांना संपर्क केला असता त्यांनी हा प्रकार सुरत पोलिसांच्या अखत्यारित असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news