छत्रपती संभाजीनगर : धावती रेल्वे पकडताना तरुणाचा गंभीर अपघात | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : धावती रेल्वे पकडताना तरुणाचा गंभीर अपघात

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धावत्या रेल्‍वेमध्ये चढत असताना 35 वर्षीय तरुण खाली पडला. यामध्ये त्‍याचे दोन्ही पाय कापले गेले. ही घटना गुरुवारी (दि.8) सकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं 2 वर घडली. त्याला रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सेना टीमने घाटीत दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुमन शंकर परीला (35, रा. कमलपुर, हैद्राबाद) असे या तरुणाचे नाव असून तो आज सकाळी काजीपेट ते दादर एक्सप्रेसने मुंबईकडे चालला होता. गुरुवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास ही एक्सप्रेस छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आली.

दरम्‍यान, सुमन नाश्ता करण्यासाठी उतरला आणि कॅन्टीनमध्ये गेला. तेवढ्यात गाडी सुटली हे पाहून ती पकडण्यासाठी सुमन धावत आपल्या डब्याकडे जात धावती रेल्वे पकडतानाच त्याचा तोल गेला. तोल गेल्‍याने तो प्लॅटफॉर्म आणि डब्बा यामधील जागेतून खाली थेट रेल्‍वेच्या खाली ट्रॅक वर पडला. या अपघातात त्याचे दोन्ही पाय कापले गेले. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सेनेचे सदस्य व नागरिक घटनास्थळी धावले. त्‍याला सर्वांनी उचलले आणि प्लॅटफॉर्मवर आनले आणि उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

.हेही वाचा 

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन : राधाकृष्ण विखे-पाटील

व्यभिचाराच्या आधारावर घटस्फोटासाठी मुलाला ‘शस्त्र’ म्हणून वापरले जाऊ शकत नाही : उच्च न्यायालय

संगमनेरात काहीजणांचा हेतू पुरत्सर दंगली घडविण्याचा प्रयत्न  : आ थोरात ; निळवंडे च्या पाण्याचे केले पूजन

Back to top button