छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन योजनेत शासनालाच चुना; पाईपलाईनसाठी फोडला पुल | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन योजनेत शासनालाच चुना; पाईपलाईनसाठी फोडला पुल

सुलतानपूर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करुन विविध योजना राबवत आहे. काम मिळालेल्या एजन्सी स्वत:च्या फायद्यासाठी शासनाच्या तिजोरीवर जेसीबी चालवताना दिसत आहेत. टाकळी राजेराय येथे सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईन दिसत असताना देखील चक्क राज्यमहामार्गावरिल पुल फोडला आहे.

शासनाने सर्वसामान्याची पाण्याची गरज ओळखून जलजीवन योजना कार्यांवित केली असुन यात गावागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. माञ, हा कोट्यावधीचा निधी खर्च करण्यासाठी कोट्यावधी रुपयालाच चुना लावण्याचे काम सध्या सुरु आहे. टाकळी राजेराय येथे जलजीवन मिशन योजनेअतर्गंत पाईपलाईनचे काम प्रगती आहे. परंतु ही पाईपलाईन टाकण्यासाठी संबधित एजन्सीने चक्क जटवाडा जैतखेडा पिशोर हा राज्यमहामार्गच खोदण्यास सुरुवात केली असुन टाकळी ते धामणगाव रस्त्यादरम्यान चक्क नळकांडी पुलच फोडले आहे. विशेष म्हणजे या लहान पुलाचे मागिल वर्षीच काम झाले आहे आणि ते सुस्थितीत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागावर लक्ष

होत असलेल्या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असुन तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुल आणि रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय निर्णय घेईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. या राज्यमहामार्गावर कोट्यावधी रुपये खर्चुन कामे केली जात आहे. एकीकडे एक योजना राबविली जात आहे तर दुसरीकडे शासनाचाच निधीचा बोजवारा उडवला जात आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button