केज तालुक्‍यात तीन वेगवेगळे अपघात; जीवितहानी नाही | पुढारी

केज तालुक्‍यात तीन वेगवेगळे अपघात; जीवितहानी नाही

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज तालुक्यात होळीच्या दिवशी तीन वेगवेगळे अपघात घडले. यात वाहनांचे नुकसान झाले आहे, परंतु कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.

दि. ६ मार्च रोजी कापरेवाडी येथून केज-कळंब रोडने कळंबकडे हरबरा विक्रीसाठी घेऊन जात असलेले पीकअप क्र. (एम एच-४४/यु २२८५) याने रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास साळेगाव येथे गित्ते वस्ती जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून धडक दिली. यात पिकअपचे नुकसान झाले. मात्र जीवितनाही किंवा कोणी जखमी झाले नाही.

दुसऱ्या घटनेत केज-बीड रोडवर दि. ६ मार्च रोजी ११:०० वा. सुमारास गंगा माऊली साखर कारखान्याजवळ कदमवाडी पाटी जवळ खुशाल ट्रॅव्हल्सच्या नांदेड-पुणे ट्रॅव्हल्स क्र. (एम एच-२७/ए-९९९५) ने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले. कोणीही जखमी झाले नाही. ट्रॅक्टर स्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पलटी झाला. यात ट्रॅक्टर व ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले.

तर तिसऱ्या घटनेत केज-बीड रोडवर दि. ६ मार्च रोजी १२:०० वाजण्याच्या सुमारास मस्साजोग येथे मालवाहू ट्रक क्र. (एम एच-१२/यु एम-८७३४) हा बस स्‍टॅडजवळ दुभाजकाला धडकला. यात ट्रकचे नुकसान झाले, मात्र कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा : 

Back to top button