International Women’s Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं खास डूडल
पुढारी ऑनलाईन आज 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) निमित्त सर्च इंजिन गुगलने (Google) ने खास डूडल साकारून महिलांचा गौरव केला आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला आहे.
इंटरनेटवरील सर्च इंजिन गुगल नेहमीच वर्षातील महत्वाच्या दिवसांचे, सणांचे, व्यक्तींचे किंवा अनेक विषयांना वाहिलेले डूडल साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. त्यांच्या या कलाकृती नेहमीच आकर्षक आणि नाविण्यपूर्ण असतात. आज जागतिक महिला दिनानिमित्तही गुगलने खास डूडल साकारून महिलांचा गौरव केला आहे.
दरवर्षी ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) जगभर साजरा केला जातो. यासाठी गुगलने बनवलेल्या खास डूडलमध्ये भाषण करणारी महिला, आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, अवकाश निरिक्षण करणाऱ्या महिला, ज्येष्ठांची काळजी घेणारी महिला, लहान मुलांचे संगोपण करणारी माता, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत महिला अशा समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचे चित्रण या डूडलमधून साकारण्यात आलंय. तुम्ही सर्च इंजिन गुगलवर जावून डूडलवर क्लिक केल्यास तुम्हाला स्क्रिनवर मलिलाचे हात दिसतील. या हातांमध्ये निळ्या, जांभळ्या रंगाचे झेडे फडकताना दिसतील.
हेही वाचा :

