बीड : कुप्पा फाट्याजवळ ऊसाच्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक; एकजण ठार | पुढारी

बीड : कुप्पा फाट्याजवळ ऊसाच्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक; एकजण ठार

वडवणी; प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील कुप्पा फाट्याजवळ उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलने जोराची धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना काल (गुरुवार) रात्री घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्‍यातील कुप्पा फाट्याजवळ उभ्‍या असलेल्‍या ऊसाच्या ट्रॉलीला मोटारसायकलची जोराची धडक दिली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील घुगे शिवजी (वय 45 वर्ष) रा. सोनखेड ता.सोनपेठ जि. परभणी या व्यक्‍तीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.

हेही वाचा : 

Back to top button