नांदेड : माळेगावच्या खंडोबा यात्रेसाठी यंदा २०० बसेसची व्यवस्था | पुढारी

नांदेड : माळेगावच्या खंडोबा यात्रेसाठी यंदा २०० बसेसची व्यवस्था

माळाकोळी; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेसाठी यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दोनशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रवाशांनी याचा पुरेपूर फायदा घेऊन एसटी महामंडळ सहकार्य करावे असे आव्हान नांदेड विभाग प्रमुख मंगेश कांबळे यांनी मालेगाव यात्रा आढावा बैठकीत केले आहे.

माळेगाव यात्रेच्या निमित्ताने पूर्वतयारीच्या आढावा बैठक आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत अनेक विभाग प्रमुख उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या वतीने यंदा माळेगावच्या खंडोबा यात्रेसाठी नांदेड विभागातून १३० बस लातूर विभागातून ४० बस व परभणी विभागाच्या वतीने ३० बसेसची व्यवस्था यंदासाठी करण्यात येणार आहे. या यात्रेत प्रवाशांनी प्रवास करून एसटीला सहकार्य करावे असे आव्हान यावेळी कांबळे यांनी केले.

प्रवाशांच्या सेवेसाठी नांदेड मार्ग, लातूर मार्ग व परभणी मार्गावर महिला प्रवासी असल्याने त्यांना स्वच्छता ग्रहाची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी विभाग नियंत्रक कांबळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, यात्रा सचिव यांनी या सर्व मागण्या मान्य करून तात्काळ सुविधा देण्यात येतील अशीही सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button