अणुयुद्धाचे सावट : अणू बाँबचा वापर पहिल्यांदा करण्यासाठी धोरण – पुतिन | Russia Ukraine War

अणुयुद्धाचे सावट : अणू बाँबचा वापर पहिल्यांदा करण्यासाठी धोरण – पुतिन | Russia Ukraine War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होऊन दहा महिने झाले आहेत. हे युद्ध संपण्याची चिन्हे नसतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा अण्विक शस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. कोणत्याही संघर्षात अणू बाँब आणि इतर अण्विक अस्त्रे पहिल्यांदा न वापरण्याचे रशियाचे धोरण आहे, पण हे धोरण बदलू असे सूतोवाच त्यांनी केले आहे. (Russia may abandon no first use nuclear doctrine)

पुतिन यांनी दोनच दिवसांपूर्वी अणुयुद्धाची भीती वाढत आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी रशियाच्या धोरणात बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

क्रिगस्तानची राजधानी बिश्टेकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबद्दचे मत व्यक्त केले. "अण्विक शस्त्रे शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचे रशियाचे धोरण आहे. समजा रशियावर कुणी अण्विक क्षेपणास्त्र डागले, तर ते रशियाच्या भूमीवर कोसळणार हे निश्चित आहे. त्यामुळे असे हल्ले परतवून लावण्यासाठी आम्ही अमेरिकेसारखे धोरण स्वीकारू शकतो. हे धोरण स्वसंरक्षणासाठी आहे, आम्ही फक्त याचा विचार करत आहोत."

रशिया, युक्रेन या भागांत या दिवसांत कडाक्याची थंडी असते. रशिया सध्या युक्रेनेच्या पूर्व आणि दक्षिण भागावर हल्ले करत आहे. सोमवारील रशियाने युक्रेनच्या उर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ले केले. त्यामुळे युक्रेनमध्ये उर्जेचे संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news