सीमाप्रश्नी संसदेत पुन्हा आवाज : धैर्यशील माने यांनी केला मुद्दा उपस्थित : पंतप्रधानांना मध्यस्थीचे आवाहन | पुढारी

सीमाप्रश्नी संसदेत पुन्हा आवाज : धैर्यशील माने यांनी केला मुद्दा उपस्थित : पंतप्रधानांना मध्यस्थीचे आवाहन

नवी दिल्ली, बेळगाव पुढारी वृत्तसेवा : सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तज्ज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी (दि. ९) संसदेत जोरदार आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नावर दोन्ही वाद सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून सीमावादामुळे गावागावात वाद आहे. आम्ही दोन्ही राज्यांत बंधुभाव होऊन देशाच्या एकतेला बाधा पोहचेल, अशी स्थिती सीमाभागात निर्माण झाली आहे. आम्ही दोन्ही राज्यांत बंधुभाव जपला जावा, यासाठी प्रयत्न करत आलो आहोत. पण, कर्नाटकाकडून सीमाभागात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. तेथील मराठी माणूस पिचला आहे. त्याला न्याय देवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. मात्र, तेथील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठी जनता हवालदिल होत आहे.

सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. गावागावांत दहशतीचे वातावरण आहे. पोलिस मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहेत. कन्नड रक्षण वेदिका मराठी जनतेवर अन्याय करत आहे, त्यामुळे तो शासन पुरस्कृत आहे का, असा संशय निर्माण होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नी लक्ष घालून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलावून समन्वय घडवून आणावा, अशी मागणी खासदार माने यांनी केली.

Back to top button