हिंगोली : धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी सेनगावात हिंदूंचा मूक मोर्चा | पुढारी

हिंगोली : धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी सेनगावात हिंदूंचा मूक मोर्चा

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : लव जिहाद विरोधी व धर्मांतर विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी सेनगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला-पुरुष यांच्यासह विद्यार्थी काळ्या फिती लाऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लव जिहाद विरोधी व धर्मांतर विरोधी कायदा करावा, अशा मागणीचे निवेदन सेनगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.

राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे रक्षण व प्रसार करण्याचा कायदेशीर अधिकार दिलेला आहे. हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे पैसे, नोकरी, लग्नाचे प्रलोभने दाखवून तसेच धमकावून धर्मांतर केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने धर्मांतर करून विवाह केल्याची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. लव जिहादच्या माध्यमातून हजारो हिंदू मुलींचे धर्मांतर करून पळवून नेल्याच्या घटना घडत आहेत. काही मुलींचा वापर तर देश विघातक कृत्यांसाठी तसेच आतंकवादी कारवायांसाठी करण्यात येत असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

कित्येक मुलींची निर्दयी हत्या केली जाते. अशा घटनांमुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देशाच्या सुरक्षेवर संकट आले आहे. त्यामुळे देशात लव जिहाद विरोधी कायदा करावा, अशा प्रकऱणांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करावी तसेच अशा घटनांसाठी विशेष न्यायालायची स्थापना करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button