हिंगोली : ‘तिजोरी’ ठरली चोरट्यांवर ‘भारी’! बॅंकेतील २० लाखांची रोकड राहिली सुरक्षित | पुढारी

हिंगोली : 'तिजोरी' ठरली चोरट्यांवर 'भारी'! बॅंकेतील २० लाखांची रोकड राहिली सुरक्षित

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमत शहरातील मुख्य मार्गावरील जयकाली माता महिला नागरी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न  चोरट्यांनी केल्‍याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. मात्र तिजोरी फोडण्‍यात चोरटे अपयशी ठरले आणि तब्‍बल २० लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.

वसमत शहरातील मामा चौक परिसरात जय काली माता महिला नागरी बँक आहे. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी बँकेच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आतील तिजोरी ओढत बाहेर आणली. तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्‍यांना तिजोरी फोडता आली नाही.  वजनदार तिजोरीपुढे अखेर चोरट्यांनी नांगी टाकली आणि रिकाम्या हातांनी पळ काढला.  तिजोरी न फुटल्याने मोठी रक्कम सुरक्षित राहिली आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांना समोरील गेटचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, शंकर हेंद्रे, कृष्णा चव्हाण आदींनी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button