राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे काढून उमेदवाराचा फोटो ईव्हीएमवर लावण्याबाबतची याचिका फेटाळली | पुढारी

राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे काढून उमेदवाराचा फोटो ईव्हीएमवर लावण्याबाबतची याचिका फेटाळली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बॅलेट पेपर तसेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये उमेदवाराच्या नावासमोरील निवडणूक चिन्हे काढून त्याजागी उमेदवाराचे छायाचित्र लावण्याच्या विनंतीच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. १) नकार दिला.

उमेदवाराच्या छायाचित्राबरोबर त्याचे वय, शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली होती.
या विषयाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग किंवा संबंधित विभागाकडे दाद मागा, असे सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले.

उमेदवाराच्या नावासमोर राजकीय पक्षाचे चिन्ह देण्याऐवजी त्याचे छायाचित्र, शैक्षणिक पात्रता आणि वयाची माहिती देणे जास्त संयुक्तिक असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याकडून करण्यात आला होता. यावर ईव्हीएमवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावले गेले नाही. तर ते आपल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कसे करणार? असा सवाल करीत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : 

Back to top button