बीड : सत्तेची मस्ती उरवण्याची ताकद महाराष्ट्रातील मतदारांमध्‍ये आहे : आजित पवार | पुढारी

बीड : सत्तेची मस्ती उरवण्याची ताकद महाराष्ट्रातील मतदारांमध्‍ये आहे : आजित पवार

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लोकशाहीत मताचा आदर करावा लागतो. आमिषे, धमक्या देऊन व फोडाफोडीचे राजकारण करुन सत्तेत आलेल्यांची मस्ती उतरवण्याची ताकत महाराष्ट्रातील मतदारात आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते आजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आज (दि. १७) केला. माजलगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजलगाव येथील राजस्थानी मंगल कार्यालयात माजलगाव, वडवणी, धारुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना  विरोधी पक्षनेते आजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवावी लागेल. बूथ बांधणीसह समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व देणे व पक्षाची ताकत वाढवण्यासाठी जिल्हा बॕक, कारखाने, विविध संस्था चांगल्या पध्दतीने चालवल्या पाहिजेत. तरच आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून येतील.

राज्यातील फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाबाबत शिंदे फडवणीस सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. १५ जुलै २०२२ रोजी १ लाख ७५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प नियोजित केला तेव्हा आम्ही मंत्री नव्हतो. गुजरातला प्रकल्प पाठवून महाराष्ट्रातील २ लाख तरुणांचा रोजगार हिरावला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसल्याच्या कोणत्याही प्रकल्पाला आमचा पांठिबा राहील; पण विरोधकांना राज्यातील प्रकल्प गुजरातलाच पाठवायाचे आहेत, अशी टीकाही पवार यांनी केली.

हेही वाचा :

 

Back to top button