Mobile Banking virus : देशातील सायबर क्षेत्रात नवा व्हायरस, मोबाईल बॅकिंग ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका | पुढारी

Mobile Banking virus : देशातील सायबर क्षेत्रात नवा व्हायरस, मोबाईल बॅकिंग ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील सायबर क्षेत्रात ट्रोजन व्‍हायरस पसरत आहे. मोबाईल बॅकिंगचा वापर करणार्‍या ग्राहकांना लक्ष्‍य करणाऱ्या या व्‍हायरसमुळे त्‍यांच्‍या Android फोनमधील फाईलला नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. ( Mobile Banking virus ) तसेच आर्थिक फसवणुकीचा धोका असून, हा व्‍हायरस मोबाईलमध्‍ये आला तर त्‍याला डिलिट करणेही खूपच अवघड आहे, अशी माहिती देशाच्या फेडरल सायबर सुरक्षा एजन्सीने ( इंडियन कंप्‍यूटर एमरजेंसी रेस्‍पॉन्‍स टीम ‘सीईआरटी’ ) दिली आहे.

Mobile Banking virus : जुलै २०२२ मध्‍ये प्रथम दृष्‍टीक्षेपास

‘सीईआरटी’ ही सायबर हल्‍ले प्रतिबंधित करणारी केंद्रीय संस्‍था आहे. सायबर क्षेत्रातील आर्थिक फसवणूक ( फिशिंग, हॅकिंग ) आणि ऑनलाईन व्‍हायरस हल्‍ल्‍यापासून इंटरनेटचे संरक्षण करण्‍याचे काम ही संस्‍था करते. नव्‍या मोबाईल बँकिंग व्‍हायरस संदर्भात ‘सीईआरटी’ने म्‍हटलं आहे की, भारतातील सायबर क्षेत्रात हा व्‍हायरस जुलै २०२२ मध्‍येच दृष्‍टीक्षेपात आला होता.मोबाईल बँकिंगचा वापर करणार्‍या ग्राहकांना नव्‍या ‘ट्रोजन’ व्‍हायरस लक्ष्‍य करत आहेत.

‘ट्रोजन’ व्हायरसचा पहिला व्‍हर्जन सप्‍टेंबर २०२१मध्‍ये बाजारात विक्रीसाठी आला होता. हा व्‍हायरस लॉगिंग झाल्‍यानंतर वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डची माहिती करुन घेणे आणि ॲपला डॅमेज करण्‍यापर्यंत तो मजल मारु शकतो. हा मोबाईल बॅकिंग व्‍हायरस यापूर्वी अमेरिका, रशिया आणि स्‍पेन या देशांमध्‍ये धुमाकूळ घालत हेता. २०२२ नंतर तो भारतासह अन्‍य देशांमध्‍येही मोबाईल बॅकिंग ग्राहकांना लक्ष्‍य करण्‍यास सुरुवात केली आहे.

ट्रोजन व्‍हायरसचे नवीन व्‍हर्जन हे बोगस Android ॲपमध्‍ये छुप्‍या पद्‍धतीने शिरकाव करते. यानंतर ते Chrome, Amazon, NFT ( क्रिप्‍टो मुद्राशी संबंधित टोकन ) अशा लोकप्रिय ॲपच्‍याबरोबर दिसते. वरील ॲप इंस्‍टॉल करताना याची वापरकर्त्याला याची माहिती नसते, असे ‘सीईआरटी’ने म्‍हटलं आहे.

हा व्हायरस प्रमुख कंपनियांच्‍या नावावर ‘एसएमएस’च्‍या माध्‍यमातून आर्थिक फसवणुकीच्‍या हेतूनेच वितरित केला जातो. आता ट्रोजन व्‍हायरसच्‍या पाचवे अपग्रेड व्‍हर्जन बाजारात आले आहे. यामुळे Android फोनवरील सर्व आकडेवारी मिळवणे आणि त्‍याचा दुरुपयोग होण्‍याची क्षमता या पाचव्‍या व्‍हर्जनमध्‍ये आहे. स्‍मार्ट फोनमध्‍ये बोगस Android ॲप्‍लिकेशन इंस्‍टॉल झाल्‍यानंतर मोबाईल फोनवरील अन्‍य ॲप्‍लिकेशनची सूचीच संबंधितांना मिळते. व्‍हायरस हा व्‍हायरस ग्राहकांची गौपनीय माहिती धोक्‍यात आणू शकतो. यामुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धोका असल्‍याची भीतीही ‘सीईआरटी’ने व्‍यक्‍त केली आहे.

कसा कराल या व्‍हायरसचा मुकाबला

सीईआरटीने म्‍हटले आहे की, “ग्राहकांनी मोबाईल फोन‍‍मध्ये केवळ अधिकृत ॲप डाऊनलोड करावेत. शक्‍यतो गुगल प्ले स्टोअरमधूनच मोबाईल अॅप डाउनलोड करा. ॲपच्‍या अन्‍य वापरकर्त्यांचा अनुभव आणि टिप्‍पणींचाही विचार केला पाहिजे. कुठल्याही मोबाइल बँकिंग अॅपमध्ये ऑटो लॉगइनचा पर्याय वापरू नका.तसेच नियमित अँड्रॉइड अपडेट्स करत राहावे. तसेच जे ई-मेल आणि एसएमएस तुम्‍हाला तुम्‍हाला प्राप्‍त होतील यातील केवळ अत्‍यंत विश्‍वसनीय अशाच लिंकचा वापर केला जावा. तसेच राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करते, त्याचे पालन करावे.”

हेही वाचा : 

 

Back to top button