नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लष्कर- ए- तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव चीनने रोखून धरला आहे. संयुक्त राष्ट्रात (UN) अमेरिकेने हा प्रस्ताव मांडला होता आणि भारताने त्याला पाठिंबा दिला होता. पण चीनने हा प्रस्ताव रोखून धरला आहे.
अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावात मीरची मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्रे बंदीची मागणी करण्यात आली होती. मीर यांच्यावर अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FAFT) च्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने जून मध्ये साजिद मीरला टेरर फंडिग प्रकरणी १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण, पाकिस्तानने अद्याप त्याच्यावर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल गुन्हा दाखल केलेला नाही.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याचे सर्व प्रस्ताव चीनने या वर्षी रोखून धरले आहेत. गेल्या महिन्यात जैश-ए मोहम्मद (जेईएम) चा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता अब्दुल रौफ अझहर याला काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव तांत्रिक कारणास्तव रोखून धरण्यात आला होता.
या वर्षी जूनमध्ये १२६७ अल-कायदा प्रतिबंध समितीमध्ये अब्दुल रहमान मक्की यांच्या विरोधात अमेरिका आणि भारताने आणलेला आणखी एक संयुक्त प्रस्ताव चीनने रोखला होता.
हे ही वाचा :