बीड: आठवडी बाजाराला आला अन जीव गमावला | पुढारी

बीड: आठवडी बाजाराला आला अन जीव गमावला

बीड पुढारी वृत्तसेवा: धारूर शहरात सोमवारी आठवडी बाजारासाठी आलेल्या एक अल्पभुधारक शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

धारूर तालुक्यातील पिंपरवाडा ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकडा तांडा येथील अल्पभुधारक शेतकरी बंडू धोंडीबा जाधव (वय 57) हे नेहमीप्रमाणे पत्नीसह धारुर शहरात आठवडी बाजारासाठी सकाळी 10 च्या सुमारास आले. बसस्थानका समोरील राष्ट्रीय महामार्गावर खासगी वाहनातून उतरले. यावेळी बाजाराकडे चालत जात असताना बंडू जाधव हे अचानक रस्त्यावर कोसळले. याप्रसंगी सोबत असलेल्या पत्नीने आरडाओरड केला. एकच टाहो फोडला त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

 

Back to top button