नांदेड : तरूणाच्या डोक्यात फावडे घालून खून; एकास अटक | पुढारी

नांदेड : तरूणाच्या डोक्यात फावडे घालून खून; एकास अटक

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :  गवंडी काम करणाऱ्या तरूणाच्या डोक्यात फावडे घालून घरमालकाने खून केला. तसेच शेजारच्या महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले. ही घटना अंबाडी येथे बुधवारी (दि.२९) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. वशिम शेख महेबुब खुरेशी (वय २२, रा. किनवट ) असे या तरूणाचे नाव आहे. तर विशाखा भारत मुनेश्वर (वय ५३, रा. अंबाडी) ही महिला जखमी आहे. याप्रकरणी उत्तम गणपत भरणे (वय ५२, रा. अंबाडी) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अंबाडी येथील संशयित आरोपी उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या या बांधकाम काम वशिम शेख करत होता. यादरम्यान तहान लागल्याने वाशिम शेख याने उत्तम भरणे याच्याकडे पाणी मागितले. यावेळी तू फार हळू करतोस म्हणून उत्तम भरणे याने शेख यांच्याबरोबर वाद घातला. यादरम्यान दोघात बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात उत्तम भरणे याने शेख याच्या डोक्यात, पोटावर फावडयाने मारून त्याचा खुन केला. त्यानंतर भरणे याने शेजारी राहणाऱ्या महिलेवरही फावड्याने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. तिच्यावर तेलंगाणा येथील अदिलाबाद येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

Back to top button