कोल्हापुरातील बनावट नोटा छपाई आणि विक्री रॅकेटचा छडा; ७ जणांना अटक | पुढारी

कोल्हापुरातील बनावट नोटा छपाई आणि विक्री रॅकेटचा छडा; ७ जणांना अटक

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा पाचशे रुपये किंमतीच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटांची छपाई करणाऱ्य कोल्हापूर व पुणे येथील टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. कोल्हापुरातील एका म्‍हाेरक्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुण्यातील काही सराईतांचा समावेश आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार शिंदकर यांच्यासह पथकाने पुणे व परिसरात छापेमारी करून बनावट नोटांची छपाई करणारी मशिनरी आणि अन्य साहित्य हस्तगत केले आहे.

बनावट नोटा प्रकरणाचे रॅकेट महाराष्ट्रासह अन्य राज्यात विखुरले असून कोल्हापूर पोलीस दलाने टोळीचा भांडाफोड करण्यासाठी पावले उचलली आहेत.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील काही एटीएम सेंटरमध्ये 500 रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर यांनी या प्रकरणाचा छडा लावत असताना कोल्हापूर येथील एका सावकार पुत्राचा समावेश असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेऊन चौकशीची व्याप्ती वाढविण्यात आली.

बनावट नोटा प्रकरणाचे मुंबई पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलीस पथकाने ठीकठिकाणी छापे टाकून म्होरक्यासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वांची कसून चौकशी सुरू झाली आहे. एक दोन दिवसात टोळीचा भांडाफोड होईल असे सांगण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button