केजरीवालांना दिलासा, मुख्‍यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी करणारी तिसरी याचिका फेटाळली

केजरीवालांना दिलासा, मुख्‍यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी करणारी तिसरी याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिकेवर आज (१० एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणातील याचिकाकर्ता न्यायालयाला राजकीय जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असे फटकारत  याचिकाकर्ता आपचे माजी आमदार संदीप कुमार यांना ५० हजारांचा दंडही ठोठावला.

संदीप कुमार यांनी आपल्‍या याचिकेत म्‍हटलं होतं की, केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) अटक केली आहे. यानंतरही ते दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कायम आहेत. यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या अनेक घटनात्मक गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्‍याचबरोबर त्‍यांच्‍या जीवनाच्या हक्काचेही उल्लंघन होते. .कुमार यांनी केजरीवाल यांना पूर्वलक्षी प्रभावाने किंवा त्याशिवाय दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची विनंती केली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलाने आज न्यायालयाला सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी काही कर्तव्ये पार पाडावीत," असे निवेदन सादर करण्यात आले.

'कृपया इथे राजकीय भाषण देऊ नका'

आजच्‍या सुनावणीवेळी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, कृपया इथे राजकीय भाषण देऊ नका! पार्लर किंवा रस्त्यावर जा. आम्हाला राजकीय जाळ्यात अडकवू नका,"
याचिकाकर्त्याच्या वकिलाने केस कायदा वाचण्यास सुरुवात केली परंतु कोर्ट प्रभावित झाले नाही. आम्ही तुमच्यावर आता काही मोठी किंमत लादणार आहोत! ही तिसरी वेळ आहे! आम्‍ही तुम्‍हाला ५० हजारांचा दंड ठोठावत आहे. न्यायालयाच्या आत राजकीय युक्तिवाद केला जाणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

न्‍यायालय म्‍हणजे जेम्स बाँडच्या चित्रपटाचे 'सिक्वेल' नाही

न्‍यायालय म्‍हणजे जेम्स बाँडच्या चित्रपटासारखे असे सिक्वेल नाही. यापूर्वी एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांनी याच मागणीची याचिका फेटाळली होती. तरीही तुम्‍ही पाठपुरावा करत आहात हे माहित असल्याने तुमच्यावर दंड ठोठावत असल्‍याचे खंडपीठाने सांगितले. अशा याचिकांवर अंकुश ठेवण्यासाठी आर्थिक दंड हा एकमेव मार्ग आहे, असेही खंडपीठाने आपल्‍या निकालात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news