BJP Candidates List | भाजप उमेदवारांची दहावी यादी जाहीर: चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापले | पुढारी

BJP Candidates List | भाजप उमेदवारांची दहावी यादी जाहीर: चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दहावी यादी आज (दि.१०) जाहीर केली आहे.    चंदीगडमधून अभिनेत्री किरण खेरचे तिकीट कापून त्यांच्या जागी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. टंडन हे चंदीगड भाजपचे अध्यक्ष आहेत. या यादीत 8 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने या यादीत यूपी आणि बंगालमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. BJP Candidates List

भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशने मैनपुरीमधून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मच्छलीशहरमधून बीपी सरोज आणि गाझीपूरमधून पारस नाथ राय यांना तिकीट दिले आहे. याशिवाय भाजपने चंदीगडमधून संजय टंडन आणि बंगालच्या आसनसोलमधून एसएस अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. BJP Candidates List

BJP Candidates List :  भाजप उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे –

चंदीगड

चंदीगड- संजय टंडन

उत्तर प्रदेश

बलिया- नीरज शेखर
मछलीशहर – बी.पी. सरोज
गाजीपूर – पारस नाथ राय
मैनपुरी – जयवीर सिंह ठाकूर
कौशाम्बी – विनोद सोनकर
फुलपूर- प्रवीण पटेल
इलाबाद- नीरज त्रिपाठी

पश्चिम बंगाल

आसनसोल – एस. एस. अबलुवालिया

Back to top button