Lok Sabha Election 2024 : धैर्यशील माने यांची उमेदवारी फायनल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब | पुढारी

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील माने यांची उमेदवारी फायनल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब

जयसिंगपूर; संतोष बामणे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. शिवाय हातकणंगलेची जागा भाजपला जाणार अशा चर्चांना ऊत आला होता. अशातच मुंबई येथे बुधवारी (दि.२७) मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खासदार माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. खासदार माने यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे खासदार माने यांनी सातत्याने मुंबई दौरे करून उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती. शिवसेनेतून निवडून आलेले खासदार माने पक्ष फुटीनंतर शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात जात असताना हातकणंगलेतून पुन्हा उमेदवारी हवी आहे, या धर्तीवरच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शब्द घेतला होता. (Lok Sabha Election 2024)

मात्र भाजपने माने यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे खासदार माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. अखेर काल मध्यरात्री त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button