World Hearing Day 2024 : सावधान ! हेडफोनमुळे येऊ शकतो बहिरेपणा | पुढारी

World Hearing Day 2024 : सावधान ! हेडफोनमुळे येऊ शकतो बहिरेपणा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कुणी कुणाशी काही बोलायचे नाही. शाळा, महाविद्यालयांतून सुटका झाल्यावर, कामावरून घरी परतताना इतकेच नव्हे, तर घरात सतत कानाला हेडफोन

World Hearing Day 2024 लावून गाणी ऐकण्याचे अनेकांना फॅड आहे. दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक काळ हेडफोनचा वापर केल्यामुळे तरुणांमध्ये बहिरेपणा वाढत आहे. 3 मार्च हा जागतिक श्रव ण दिन म्हणून साजरा केला जातो.

सीपीआरच्या नाक, कान, घसा विभागाकडे दररोज 90 ते 100 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यामध्ये हेडफोनचा World Hearing Day 2024 अतिरेकी वापर केल्यामुळे कानावर गंभीर परिणाम झाल्याचे तीन ते चार रुग्ण असतात. हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकू येत नसल्याचे अनेक जण सांगतात. गेल्या काही महिन्यांपासून कानाला हेडफोन लावून बोलण्याचे फॅड आहे. या सगळ्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे.

ऐकायला कमी येण्याची कारणे

World Hearing Day 2024

कानात तेल किंवा पाणी घालणे
वारंवार मोठ्या आवाजात ऐकणे
कान साफ करण्यासाठी टोकदार वस्तू वापरणे.
स्वतःहून औषधे खरेदी
करून घेणे.

हे लक्षात ठेवा

मोठ्या आवाजात काम करताना कानांचे संरक्षण करा.

मोठा आवाज टाळा.
हेडफोनचा वापर मर्यादित करा.
सतत कानात कापूस घालणे टाळा.
कान नेहमी कोरडे ठेवा.

हेही वाचा :

Back to top button