शस्त्रांच्या धाकावर दहशत माजविणार्‍या तिघांना अटक | पुढारी

शस्त्रांच्या धाकावर दहशत माजविणार्‍या तिघांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : धारदार शस्त्रांच्या धाकावर राजारामपुरीसह परिसरात दहशत निर्माण करणार्‍या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गौरव अशोक भालकर (वय 23), राजू भीमा पंतोजी (23, दोघे रा. सम्राटनगर), संतोष रामसिंग गौतम (27, रा. नवशा मारुती मंदिराजवळ, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गुंडागर्दी व शस्त्राच्या धाकावर दहशत माजविणार्‍या फाळकूट गुंडाविरोधात राजारामपुरी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री दोन तरुण हातात तलवारी घेऊन नागरिकांना दमदाटी करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांना मिळाली. पोलिस फौजफाट्यासह तनपुरे घटनास्थळी दाखल झाले. दारूच्या नशेत तलवार नाचविणार्‍या गौरव भालकरसह राजू पंतोजी यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. संतोष गौतमने घरात तलवार लपविल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरात जाऊन झडती घेण्यात आली. त्यालाही अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक तनपुरे यांनी सांगितले.

Back to top button