Nashik Water Shortage | देवळा तालुक्यात ६० हजार‎ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ

देवळा तालुक्यातील वार्शी धरण कोरडेठाक पडलेले(छाया-सोमनाथ जगताप )
देवळा तालुक्यातील वार्शी धरण कोरडेठाक पडलेले(छाया-सोमनाथ जगताप )

[author title="देवळा (जि. नाशिक) : सोमनाथ जगताप" image="http://"][/author]

मार्च‎ महिन्याच्या मध्यापासून तापमान ४०‎ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने‎ पाणी टंचाईची दाहकता झपाट्याने‎ वाढत वाढत आहे. ३० दिवसामध्येच‎ २० फूट खोल भूजल पातळी गाठली‎ आहे. सद्यःस्थितीत १०० फुटांपर्यंत‎ विहिरींनी तळ गाठला असून‎ तालुक्यात २६ गावे ३७ वाड्या‎ वस्त्यांवर ३२ टँकरच्या साह्याने पाणी‎ पुरवठा होत आहे. ६० हजार‎ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ‎ सोसावी लागत असून टंचाईची धग‎ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.‎ तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या वाढली आहे.‎ फेब्रुवारीत तालुक्यात १५ टँकर सुरू‎ होते. मात्र, महिन्याभरात टँकरची‎ संख्या ३२ वर गेली असून २६\ गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसत ‎आहे. नदी, नाले, ओहाेळ या‎ अगोदरच कोरडेठाक पडले आहेत. ‎ आता लहान बंधारे, धरणेही कोरडे ‎झाले आहेत. अशा स्थितीत वाड्या ‎वस्त्यांना केवळ विहिरींचा आधार ‎ उरला होता. आता तोही संपुष्टात‎ येऊ लागला आहे. नागरिकांसोबत ‎ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.‎

तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने वार्षि व कणकापूर ,शेरी ,वडाळा येथील छोटे मोठे पाझर तलावांनी डिसेंबर अखेरच तळ गाठल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या .परिणामी याठिकाणी नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले .खर्डे येथे पाच दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येत आल्याने हंडा भर पिण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे . पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने पशुपालकांना मिळेल तेथून चारा आणावा लागला . पाण्याअभावी शेतकऱ्यांना कांदा सह भाजीपाला आदी पिके घेता आली नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे .यामुळे मजुरांवर देखील उपासमारीची वेळ ओढावली .

या गावांना टँकरने‎ पाणीपुरवठा

गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे,‎ मेशी, चिंचवे, भिलवाड, डोंगरगाव,‎ सांगवी, वराळे, दहिवड, वाखारी,‎ तिसगाव, शेरी, कणकापूर, कांचने,‎ पिंपळगाव, गुंजाळनगर, उमराणे,‎ महात्मा फुले नगर, खर्डा, श्रीरामपूर, खुंटेवाडी, मुलूकवाडी,खडकतळे ,वाजगाव या‎ वाड्या वस्त्यांची भर पडली आहे.‎

मागील वर्षी कमी पाऊस

तालुक्यात गतवर्षी ८०० मिमी पाऊस‎ पडला होता. यंदा ३०५ मिमी पाऊस‎ झाला. गतवर्षांच्या तुलनेत ४९५‎ मिमी अत्यल्प पावसाने व पूर‎ पाण्याने उजव्या वाढीव‎ कालव्यावरील किशोर सागर १००‎ टक्के भरले होते. मात्र मार्च एप्रिलमध्ये ह्या धरणार फक्त मृत साठा शिल्लक असल्याने यावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने लाभक्षेत्रातील गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. याची दाहकता लक्ष्यात घेत प्रशासनाने 30 एप्रिल ला चनकापूर उजव्या कालव्या द्वारे ह्या धरणार पाणी सोडले .यामुळे वाजगाव ,वडाळा ,मटाने,गुंजाळनगर ,रामेश्वर येथील गावांना दिलासा मिळाला आहे .‎

सद्यःस्थितीत देवळा तालुक्यात सुरू असलेले‎

  • टँकर – ३२
  • अधिग्रहण केलेल्या विहिरी – ३०‎
  • २१ गावे ३७ वाड्या‎

गेल्या पाच वर्षांची पावसाची स्थिती

  • २०१७/१८ – ४०६.६६ मिमी,
  • २०१८/१९ – ३०१.५३ मिमी ,
  • २०१९/२०- ५८६.३६ मिमी ,
  • २०२०/२१ – ८६५.०३ मिमी ,
  • २०२१/२२ – ८०० मिमी,
  • २०२२/२३ – ३०५ मिमी .

जमिनीची भूजल पातळी

  • – जानेवारी – ५५ फूट खोल,
  • फेब्रुवारी – ७० फुट खोल ,
  • मार्च – ९० फूट खोल ,
  • एप्रिल – १०० फूट खोल

तालुक्यातील टँकरची वाढती संख्या-

जानेवारी १० टँकर ,

फेब्रुवारी – १५ ,टँकर

मार्च २५ टँकर ,

एप्रिल ३२ टँकर.

———–

देवळा तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याची टंचाई असुन टँकर तसेच विहीर अधिग्रहणाच्या माध्यामातुन 25 गावे व 37 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठवड्यात चणकापुरमधुन आवर्तन मिळाल्याने काहीसा दिलास मिळाला आहे.मात्र सर्वांचे डोळे वरूण राजाच्या आगमनाकडे लागले आहेत.सद्यस्थितीत पिक पेऱ्यानुसार मुबलक चारा उपलब्ध आहे. प्रशासन टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवुन असुन वेळोवळी उपाययोजनांची आखणी केली जात आहे.

-मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, देवळा

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news