अमृतसरमध्ये मतदानापूर्वी आप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, ४ जखमी

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील अमृतसरमध्ये मतदानापूर्वी आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरु नगरीमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आणि त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना सीमावर्ती लखुवाल गावात शुक्रवारी (दि.१) रात्री घडली. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता दीपिंद्र सिंग दीपू त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर बसला होता. दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. गोळी लागल्याने दीपूचा मृत्यू झाला. तर त्याचे चार मित्र जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेमागील सर्व कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news