कोल्हापूर: जिल्ह्यातील १४ धरणांतून विसर्ग बंद; पावसाचा जोर वाढला | पुढारी

कोल्हापूर: जिल्ह्यातील १४ धरणांतून विसर्ग बंद; पावसाचा जोर वाढला

 राशिवडे; पुढारी वृतसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तुळशीसह बारा धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. घटप्रभा धरण शंभर टक्के भरले आहे. घटप्रभा आणि पाटगाव धरण क्षेत्रामध्ये उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तर वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये  निच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने तब्बल महिनाभर उशीराने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला होता. पाणीबाणीचे भीषण संकट उभे ठाकले असताना वरुणराजाने हजेरी लावली. जिल्ह्यातील प्रमुख धरणे रिकामी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे भरण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी, काळम्मावाडी, वारणा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे

कंसात चोवीस तासातील पावसाची मिमी मधील नोंद व एकूण पावसाची नोंद

राधानगरी ५४ टक्के (६७) १२४४, तुळशी ३० टक्के (४२) ६८६, वारणा ४६ टक्के (२९) ४२१, काळम्मावाडी २२ टक्के (४१) ७९४, कासारी ४७ टक्के (६२) १२९३, कडवी ४८ टक्के (६५) ९७९, कुंभी ५५ टक्के (५५), पाटगाव ४२ टक्के (१४३) २२७२, चिकोत्रा ३१ टक्के (५०) ५३१, चित्री २७ टक्के (८८) ६९४, जंगमहट्टी ३१ टक्के (४०) ४५४, घटप्रभा शंभर टक्के (१४७) १८५३

हेही वाचा : 

Back to top button