कोल्‍हापूर : शिवपार्वती तलावाच्या पश्चिमेला पाणलोट क्षेत्रात अनाधिकृत बांधकामे रद्‌द करावी; सर्वपक्षीय कृती समिती | पुढारी

कोल्‍हापूर : शिवपार्वती तलावाच्या पश्चिमेला पाणलोट क्षेत्रात अनाधिकृत बांधकामे रद्‌द करावी; सर्वपक्षीय कृती समिती

वडणगे : पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर) येथील शिवपार्वती तलावाच्या पश्चिमेला पाणलोट क्षेत्राला लागून झालेले भूखंड व येथे होणाऱ्या बांधकामाला मनाई करण्यात यावी अशी मागणी वडणगे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन कोल्हापूर विकास प्राधिकरण अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, बांधकाम अधिनियमानुसार तलावासारख्या नैसर्गिक जलस्तोत्रापासून तीनशे फूट अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई असताना,वडणगे येथील शिव पार्वती तलावाच्या पश्चिमेला पाणलोट क्षेत्राला लागून भूखंड पाडण्यात आले आहेत. आधीच तलावाच्या पश्चिमेकडील वसाहतीमधील सांडपाणी थेट तलावात मिसळून तलाव प्रदूषित झाला असताना, या नव्याने झालेल्या भूखंडावर होणाऱ्या बांधकामामुळे तलावाच्या प्रदूषणात आणखी भर पडणार आहे.

दरम्‍यान, तलावाला अगदी खेटून पाडण्यात आलेल्या या भूखंड व बांधकामाला मनाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याच बरोबर तलावाच्या हद्दीत झालेली अतिक्रमणे हटवून, मोजणी करून तलावाची हद्द निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस राजेंद्र पोवार, दादासो शेलार, शिरीष कुंभार, सचिन मगदूम , तानाजी शिंदे, रवी मोरे , सुनील परीट , मोहन पाटील, उमेश नांगरे उपस्थित होते.

 

Back to top button