कोल्हापूर : फुटबॉल हुल्लडबाजी; दहा जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल हुल्लडबाजी; दहा जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  फुटबॉल सामन्यातील ईर्ष्येतून मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये वारंवार होणारी वादावादी, हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. या दोन्ही मंडळांतील 10 जणांना शहर आणि करवीर तालुक्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव जुना राजवाडा पोलिसांनी पोलिस उपाधीक्षकांकडे पाठविला आहे.

27 एप्रिलला इंगवले चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातच होणार असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. पाटाकडील तालीम मंडळाच्या सचिन हिंदुराव पाटील, दीपक जयवंत थोरात, उमेश ऊर्फ राजू परशुराम पाटील, विशाल सुनील जाधव, सुमीत श्रीनिवास जाधव, अनिकेत राहुल घोटणे (सर्व रा. मंगळवार पेठ) तसेच शिवाजी तरुण मंडळाच्या राकेश संभाजी जांभळे, अभिषेक श्रीकांत इंगवले, निखिल उत्तम कोराणे, रोहित शिवाजीराव मोरे (सर्व रा. शिवाजी पेठ) अशी त्यांची नावे आहेत.

Back to top button