कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मंजूर : राजेश क्षीरसागर | पुढारी

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मंजूर : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार लवकरच महापालिकेकडे निधी वर्ग केला जाईल. शहरातील प्रमुख 16 रस्त्यांची बांधणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत निधी मंजूर झाला असून, त्यात राज्य शासनाचा 70 टक्के हिस्सा म्हणजेच 70 कोटी 23 लाख आणि महापालिका 30 टक्के म्हणजे 30 कोटी 10 लाख असा आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन 237 कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. तसेच प्रस्तावाचे दोन टप्पे करण्याची सूचनाही महापालिकेला केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 100 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता, असेही क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.

या 16 रस्त्यांचा समावेश, कंसात रक्कम…

* दसरा चौक, बिंदू चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, नंगीवली चौक, इंदिरा सागर हॉटेल, समाधान हॉटेल ते आय कॉर्नर – (9,75,11,198 रु.).
* सुभाषरोड, भोले हॉस्पिटल – (3,98,98,756 रु.)
* लक्षतीर्थ चौक, निगवेकर गोडाऊन, अण्णासाहेब शिंदे स्कूल – (1,51,43,936 रु.)
* राजारामपुरी माऊली चौक, हुतात्मा चौक, गोखले कॉलेज चौक कन्हैया सर्व्हिसिंग सेंटर, विश्वजित हॉटेल – (7,22,20,087 रु.)
* निर्मिती कॉर्नर कळंबा जेल (2,09,59,058)
* राधानगरी रोड गंगाई लॉन (17,42,70,218 रु.)
* शाहूसेना चौक, झूम एसटीपी प्रकल्प (3,51,38,106 रु.)
* अनुग्रह हॉटेल, लठ्ठे पुतळा, संघवी बंगला (3,11,31,296)
* डॉ. एम. विश्वरय्या हॉल, चंदवानी हॉल (1,67,17,151 रु.)
* हॉटेल रसिका जाधववाडी रिंगरोड (4,94,25,738 रु.)
* अ‍ॅपल हॉस्पिटल, वसंतनगर, झेड. पी. कंपाऊंड (3,57,11,647 रु.)
* गोल्ड जिम, सदर बाजार चौक – (1,68,85,577 रु.)
* लक्ष्मीपुरी वाणिज्य वसाहत, जैन मंदिर, पानलाईन, धान्यबाजार – (3,88,94,641 रु.)
* वृषाली आयलँड, पर्ल हॉटेल, केएमसी फिजिओथेरपी हॉस्पिटल, नेक्स्ट क्रॉसिंग रोड (3,17,28,159, रु.)
* निर्माण चौक, जरगनगर शेवटचा बस स्टॉप (4,67,17,043 रु.)
* खरी कॉर्नर चौक, गांधी मैदान चौक, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक (9,34,17,825 रु.).

Back to top button