भारतातून 37 लाख 75 हजार 684 मे. टन साखर निर्यात | पुढारी

भारतातून 37 लाख 75 हजार 684 मे. टन साखर निर्यात

कुडित्रे; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारने 2022-23 या व्यापार वर्षामध्ये 60 लाख मे. टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार 9 मार्च 2023 अखेर 37 लाख 75 हजार 684 मे. टन (उद्दिष्टाच्या 62.91 टक्के) साखर निर्यात झाल्याची माहिती शुगर ट्रेड असोसिएशनने (AISTA) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

केंद्र सरकारने 22-23 या 30 सप्टेंबरअखेर संपणार्‍या साखर हंगामामध्ये 60 लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी साखर कारखान्यांना दिली होती. त्यानुसार साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 22 ते 9 मार्च 2023 अखेर 37 लाख 75 हजार 684 मे. टन साखर (उद्दिष्टाच्या 62.91 टक्के) साखर निर्यात केली आहे. साखर वर्ष 1ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असे आहे.

यापैकी बांगला देशाला सर्वाधिक म्हणजे 5.11 लाख टन साखर निर्यात केली आहे. तर सोमालिया, सुदान, इंडोनेशिया आणि णअए. या देशांचा समावेश आहे. 1.27 लाख टन साखर अंडरलोडिंग असून 4.87 लाख टन साखर ही विविध देशांतील रिफायनरीजना निर्यात केली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 21-22 मध्ये 112 लाख टन साखरेची विक्रमी निर्यात भारतातून झाली होती.

Back to top button