कोल्हापूर : रोजगाराभिमुख मेगा जॉब फेअर नोंदणीस प्रतिसाद | पुढारी

कोल्हापूर : रोजगाराभिमुख मेगा जॉब फेअर नोंदणीस प्रतिसाद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : उज्ज्वल करिअर घडवण्याच्या दृष्टीने नामांकित कंपन्यांमधील नोकरीच्या संधी व मार्गदर्शनासाठी दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व श्री सन्मित्र सोशल फाऊंडेशन, गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 5 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे मेगा जॉब फेअरचे आयोजन केले आहे.

यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, दै. पुढारीचे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ, मार्गदर्शक जॉर्ज क्रूज यांचे ‘स्पर्धा परीक्षा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.

दहावी, बारावी, आयटीआय तसेच पदवी, पदव्युत्तर अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मेगा जॉब फेअर आयोजित केला आहे. कुशल मनुष्यबळाच्या शोधात असणार्‍या नामवंत आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, बँकिंग, मीडिया व सेवा, अ‍ॅग्रीकल्चर क्षेत्रातील कंपन्या मेगा जॉब फेअरमध्ये सहभागी होणार आहेत. जागतिकीकरण व स्पर्धेच्या बदलत्या काळात करिअर व नोकरीच्या असंख्य संधी प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सन्मित्र सोशल फाऊंडेशन, गारगोटीचे अध्यक्ष अलकेश कांदळकर यांनी केले आहे.

स्पॉट रजिस्ट्रेशन सुविधा

मेगा जॉब फेअरसाठी वाढता प्रतिसाद व ग्रामीण भागातील युवकांच्या मागणीनुसार स्पॉट रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी कंपनी तसेच उमेदवारांनी 9665242525 / 8600395495 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button