अभिमानास्पद! मेंढपाळाचा मुलगा झाला सीए | पुढारी

अभिमानास्पद! मेंढपाळाचा मुलगा झाला सीए

संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा : शेती मधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची आर्थिक स्थिती नाजूक; मात्र तरीही शिकताना आर्थिक अडचणींवर मात करीत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पानोडी येथील सोमनाथ बाळासाहेब जाधव या 30 वर्षिय तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले. शेतीसह मेंढपाळ कुटुंबातील सोमनाथ याने मिळविलेल्या या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

सोमनाथचे गावात जाधव वस्तीवर जि. प. शाळेत प्राथमिक, सरदार थोरात विद्यालयात 10 वी पर्यंत शिक्षण झाले. आश्वी खुर्द येथे 12 वी कॉमर्स शाखेमधून 65 टक्के गुण मिळवले. पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुणे येथे पार्ट टाईम काम करुन शिक्षण घेतले. सोमनाथला अनेक अडचणी आल्या, परंतु मनात जिद्द होती. वडील बाळासाहेब जाधव मेंढीपालन करत रिकाम्या वेळेत इतरांच्या शेतात बैलामागे नांगरणीसह शेती मशागत करुन घरखर्च भागवायचे. उर्वरीत रक्कम मुलाला पाठवून मुलास चार्टड अकाऊटंट होण्यास प्रेरणा दिली.

यावेळी माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, अशोकराव तळेकर, अ‍ॅड. सदाशिवराव थोरात , प्रा. रामनाथ पवार, राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे , ग्रा. पं. सदस्य संजय जाधव , रंगन्नाथ मुंढे , पांडूरंग सांगळे, पुंजा नागरे , प्रा. दीपक जाधव, जालिंदर तळेकर, भारत शेवाळे, रविंद्र जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष चव्हाण, दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी यशसाठी स्वतःहून प्रयत्नशील असावे. पालकांचे त्यांवर नियत्रण असावे. मुलांचे उच्च शिक्षण खरी संपत्ती आहे.
                                           – भाऊसाहेब चव्हाण (माजी पोलिस अधिकारी )

Back to top button