कोल्हापूर : वडणगे येथे वाहन सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी | पुढारी

कोल्हापूर : वडणगे येथे वाहन सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी

वडणगे; पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर) येथील पोवार पाणंद रस्त्याकडेला असलेल्या वाहन सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गुरुवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी सेंटरचा कडी कोयंडा कापून सुमारे अडीच लाख रूपये किमतीची वाहने धुण्याची दोन प्रेशर मशीन व पेट्रोलवर चालणारा जनरेटर लंपास केला. ही घटना आज (दि.१६) सकाळी उघडकीस आली.

पोवार पाणंद रस्त्यावर जयकुमार पाटील व विजयकुमार पाटील यांचे श्रीवर्धन सर्व्हिसिंग सेंटर आहे. गुरुवारी रात्री सेंटर बंद करून दोघे भाऊ घरी गेले होते. आज सकाळी जयकुमार सर्व्हिसिंग सेंटर उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना सेंटरचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यानंतर वाहने धुण्याची दोन प्रेशर मशीनची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी सेंटरचा कडी कोयंडा कापून मशीन तसेच पेट्रोलवर चालणारा जनरेटर चोरून नेला. या दोन्ही मशीनची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये आहे. याबाबत करवीर पोलिसांत नोंद झाली आहे.

Back to top button