कोल्‍हापूर : राज्यपालांच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन | पुढारी

कोल्‍हापूर : राज्यपालांच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) मुरगूडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

आंदोलनस्थळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, तालुका उपप्रमुख मारुतीराव पुरीबुवा यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी हटाव व महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा अवमान कदापि सहन करणार नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याला जर कोणी दुखवू पाहात असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने हिसका दाखवू. कोश्यारींच्या निषेधार्थ १७ डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या जिल्हयातून सहभागी होणार आहेत, असे देवणे यांनी सांगितले.

यावेळी तालुका युवा सेनाप्रमुख समीर देसाई, शहरप्रमुख आदिनाथ पाटील, विभागप्रमुख दिग्वीजय पाटील, विजय भोई, राहुल टिकले, धोंडीराम परीट आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button