अभिनेते रितेश -जेनेलिया यांनी केले मतदान
Latest
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी केले मतदान
लातूर ; पुढारी वृत्तसेवा लातूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या बाभळगाव येथे अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह आमदार धीरज देशमुख दीपशिखा देशमुख व वैशालीताई विलासराव देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी अभिनेते रितेश देशमुख म्हणाले, मी मुंबईहून मतदानासाठी लातूरला आलो आहे. मतदारांनीही घराच्या बाहेर पडून आपले कुटुंबिय, मित्र परिवारासह मोठ्या प्रमाणात मतदान करावे. जे वृद्ध, निराधार घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, त्यांनाही तरुणांनी मतदान केंद्रावर घेऊन जावून मतदान करवून घ्यावे. लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. बाहेर ऊन आहे, त्यामुळे काळजी घेत मतदानासाठी बाहेर पडावे आणि इतरानांही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन यावेळी रिजेश देशमुख यांनी मतदारांना केले.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 | दुपारी १ पर्यंत ३९.९२ टक्के मतदान, प. बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात कमी
- Lok Sabha Election: विजेच्या धक्क्याने दोन्ही हात गमावले, डाव्या पायाच्या अंगठ्याने बजावला मतदानाचा हक्क, पाहा व्हिडिओ
- बलात्काराचा खोटा आरोप भाेवला : तरुणीला साडेचार वर्ष कारावासाची शिक्षा, 5.9 लाखांचा दंड!

