

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत ३९.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ४९.२७ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे ३१.५५ टक्के मतदान झाले होते.
आसाम- ४५.८८ टक्के
बिहार-३६.६९ टक्के
छत्तीसगड- ४६.१४ टक्के
दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव- ३९.९४ टक्के
गोवा- ४९.०४ टक्के
गुजरात- ३७.८३ टक्के
कर्नाटक- ४१,५९ टक्के
मध्य प्रदेश- ४४.६७ टक्के
महाराष्ट्र- ३१.५५ टक्के
उत्तर प्रदेश- ३८.१२ टक्के
पश्चिम बंगाल- ४९.२७ टक्के
आज ७ मे रोजी देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील बारामती, रायगड, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. तर तिसऱ्याच टप्प्यात गुजरातमधील सर्व २६ मतदारसंघामध्येही निवडणूक होत आहे.
हे ही वाचा :