त्यांची शक्ती, माझी भीम शक्ती : रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला | पुढारी

त्यांची शक्ती, माझी भीम शक्ती : रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. पण त्या शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सर्व भीमशक्ती माझ्यासोबत आहे. ती वंचित शक्ती आहे. त्यांची शक्ती आहे, पण माझी भीमाची भक्ती आहे, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी राजकारणात जास्त फरक पडणार नाही. दलित समाज मोठ्या प्रमाणात माझ्या सोबत आहे. मी रिपब्लिकन पक्षाचे नाव टिकवून ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून फारकत घेतलेली नाही. प्रकाश आंबेडकरांची वंचित शक्ती आहे. खरी भीमशक्ती माझ्यासोबत आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती एकत्र येऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे झालेले तुकडे जोडणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी दोन पाऊले मागे येण्यासाठी मी तयार आहे. एकनाथ शिंदे ही खरी शिवशक्ती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहन आठवले यांनी प्रकाश आंबेडकारांना केले आहे.

आघाडीसाठी उद्धव ठाकरे – प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा

शिवशक्ती-भीमशक्तीच्या आघाडीची चर्चा सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास बैठक झाली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सकारात्मक असलो तरी आपल्या अटी – शर्तींवरच आघाडी होईल, असे वंचितने स्पष्ट केले आहे. तर, शिवसेनेसह महाविकास आघाडीनेसुद्धा नव्या समीकरणांसाठी सकारात्मक असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि अन्य काही नेते उपस्थित होते. वंचित आघाडी ही शिवसेनेचा मित्र पक्ष असणार की महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार, या मुद्यावर थेट द्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा :

Back to top button