विद्यापीठ सेवक संघामार्फत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद | पुढारी

विद्यापीठ सेवक संघामार्फत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर तथा बाबा सावंत यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आले. सर्व आजी-माजी अधिकारी, सेवक, शिक्षक विद्यार्थी असे ८२३ जणांनी शिबिराचा लाभ घेतला.

बाबा सावंत यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी शिबिरासाठी कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, प्र-कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे प्रमुख संजय डी. पाटील, मधुरिमाराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य तपासणी शिबिरात ह्रदयरोग, किडनी विकार, कर्करोग, मधूमेह तपासणी, ई.सी.जी., बी.एस.एल.रेंडम, नेत्र तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या.

बाबा सावंत यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले.
बाबा सावंत यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले.

यावेळी सीपीआर अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह  ह्या शिबिरासाठी भैय्या माने, श्रीमती राजलक्ष्मी दिग्‍विजय खानविलकर , डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालभा विभूते, अमित कुलकर्णी, केशव गोवेकर, डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. डी. आर. मोरे, विश्वविजय खानविलकर, माजी आमदार संपत बापू पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार अमल महाडिक, संजय पवार, विजय देवणे, रवीकिरण इंगवले, नाना कदम, सुनील कदम, गुलाबराव घोरपडे, अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, सत्यजित जाधव, राजू लाटकर, वसंतराव मुळीक, राहुल चिकोडे, मंजित माने, व्यंकाप्पा भोसले, राजू थोरावडे व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्‍थित होते.

याप्रसंगी सावंत परिवारातील श्रीमती. निशा प्रभाकर सावंत, देवेंद्र प्रभाकर सावंत, बंटी प्रभाकर सावंत, वृचिका सावंत, आकांक्षा सावंत, दिव्या सावंत, रुद्र सावंत, फत्‍तेसिंह सावंत तसेच शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचे समवेत सेवक संघाचे अन्य पदाधिकारी / सदस्‍य यांचे सर्व उपस्‍थित घटकांचे व सहकार्य लाभलेल्या तज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचे कौतुक व आभार मानण्यात आले.

हेही वाचा  

Kolhapur Ambabai : अंबाबाई मंदिरात आढळला यादवकालीन शिलालेख 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : फेब्रुवारीत वर्धा येथे पार पडणार ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

Lab-grown blood : प्रयोगशाळेमध्ये निर्मित रक्‍ताची मानवावर चाचणी सुरु : ब्रिटनमध्ये जगातील पहिली क्लिनिकल ट्रायल

Back to top button