Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : फेब्रुवारीत वर्धा येथे पार पडणार ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | पुढारी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : फेब्रुवारीत वर्धा येथे पार पडणार ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीत वर्धा येथे होत आहे. स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. हे साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होणार आहे. विदर्भासह महाराष्ट्रात शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून दत्ता मेघे अग्रगण्य समजले जातात. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

नागपूर येथे २००७ साली विदर्भ साहित्य संघातर्फे संपन्न झालेल्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्वीकारली होती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची आणि संरक्षपदाची जबाबदारी पिता-पुत्राने एकाचवेळी सांभाळणे, ही अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्त्वाची आणि अपूर्व घटना ठरणार आहे. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारली आहे. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसह वर्धा येथील साहित्यप्रेमी, कार्यकर्ते या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर आणि कोषाध्यक्ष श्रविकास लिमये यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा

Back to top button