कोल्हापुरात शुक्रवारी विशुद्धसागर महाराज – प्रणामसागर महाराज यांच्या भेटीचा सोहळा | पुढारी

कोल्हापुरात शुक्रवारी विशुद्धसागर महाराज - प्रणामसागर महाराज यांच्या भेटीचा सोहळा

किणी, पुढारी वृत्तसेवा : अक्षय तृतीयेला १० मे रोजी कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच शुक्रवार पेठ जैन मठात अध्यात्मयोगी चर्याशिरोमनी आचार्य विशुद्धसागर महाराज व भक्तामरवाले बाबा डॉ.आचार्य प्रणामसागर महाराज यांच्या भेटीचा अद्भुत सोहळा भक्तांना अनुभवायला मिळणार आहे.

अध्यात्मयोगी चर्याशिरोमनी आचार्य विशुध्दसागर महाराज हे आपल्या २९ शिष्यांसह कोल्हापूर येथे आले आहेत. योगायोगाने याचवेळी विविध जागतिक विक्रम नावावर असलेले भक्तामरवाले बाबा डॉ.आचार्य प्रमाणसागर महाराज यांचेही ९ मेरोजी सकाळी कोल्हापूर येथे आगमन होणार आहे.

अक्षय तृतीयेला शुक्रवार १० मेरोजी शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन मठात भ.आदिनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक होणार आहे. या निमिताने जैन धर्मातील हे दोन श्रेष्ठ मुनी प्रथमच भेटणार आहेत. अक्षय तृतीयेला होणारा हा संत भेटीचा सोहळा पाहणाऱ्याना अक्षय सुखाची प्राप्ती होते. अशी जैन धर्माची धारणा आहे. जैन व हिंदू धर्मात अक्षय तृयीयेला मोठे महत्त्व आहे. याच दिवशी जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भ. आदिनाथ यांनी सहा महिन्यांच्या उपवासानंतर पहिल्यांदा आहार घेतला होता. यामुळे हा दिवस जैन धर्मात सर्वात जास्त प्रभावशाली दिवस मनाला जातो.

हेही वाचा 

Back to top button