कोल्हापूर : वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर; मुरगूड- कुरणी बंधारा पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर : वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर; मुरगूड- कुरणी बंधारा पाण्याखाली

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा: गेले दोन दिवस होत असलेल्या संततधार, दमदार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने वेदगंगा नदीवरील कुरणी- मुरगूड दरम्यान असणाऱ्या बंधार्‍यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुरगूड- निढोरी- कुरणी अशी वाहतूक सुरू आहे.

भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग वेदगंगा नदी पात्रात होऊ लागला आहे. याचबरोबर सतत सुरू असणाऱ्या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वेदगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर आले असून नदीवरील बंधाऱ्यावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.

शिंदेवाडी- मुरगूड शहराला पाणीपुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर वेदगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होता; पण सध्या चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button